ट्रकचालकाला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-नगर तालुक्यातील शेंडी बायपास येथे आयशर टेम्पो उभा करून चालकावर हल्ला करत लुटल्याची घटना नुकतीच घडली होती.

नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ट्रक चालकाला लुटणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे.

अविनाश दानियल चौतमल (रा.वाळूंज, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. याबाबात अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील शेंडी बायपास येथे पेट्रोलपंपावर थांबलेल्या आयशर टेम्पो चालकावर हल्ला करत त्याला लुटल्याची घटना घडली होती.

नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास केला. त्यांच्या पथकातील पोहेकॉ बबन मखरे,

रवीकिरण सोनटक्के, संतोष लोंढे, राहुल सोळुंके, जालिंदर माने, संभाजी कोतकर यांनी औरंगाबाद येथे जावून आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment