अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar News :- निर्जन ठिकाणी, एकट्याने येऊन, रोख स्वरूपात नव्हे तर चक्क फोन पे या युपीआय पेमेंट अप्लिकेशनवरून खंडणी उकळल्याचा प्रकार राहाता तालुक्यात उघडकीस आला आहे.
विद्यार्थीनीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने सात हजार रुपयांची खंडणी अशा प्रकारे वसूल केल्या गुन्हा राहाता पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
राहाता तालुक्यातील एका गावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी विकास जगताप (रा.रामपूरवाडी ता.राहाता) याने दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.
त्यातील सात हजार रुपये त्याने युपीआय पेमेंट अपच्या माध्यमातून स्वीकारलेही. मात्र, त्यासाठी त्याने मित्राचा मोबाईल नंबर दिला होता. आता पोलिस त्यावरून त्याचा शोध घेत आहेत.
आरोपी विरूद्ध आधीच बलात्कार आणि अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला घाबरून खंडणी देण्यास मुलीच्या वडिलांनी तयारी दर्शविली.
तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे ठरले. यासंबंधी मुलीच्या वडिलांनी राहाता पोलिस ठाण्यात तक्रार दिली. खंडणी दिली नाही, तर मुलीचे इतर एका युवकासोबतचे आक्षेपार्ह फोटो गावातील नातेवाईकांना पाठविण्याची धमकी त्याने दिली होती.
राहाता पोलिसांनी आरोपी विकास जगताप (रा.रामपूरवाडी ता.राहाता) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.