अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील संजय व योगिता गाडे हे दामप्त्य खरेदीसाठी निघाले असताना त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न अगदी तोंडावर आल्याने ते बाहेर पडले होते.
परंतु नियतीने घाव घेतला आणि होत्याचे नव्हते झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील अनाथ झालेल्या दोन बहिणी व एका भावंडाच्या मदतीसाठी शेवगाव येथील मराठा वर्ल्ड टीमचे सदस्य धावून आले.
त्यांनी रोख रक्कम, फळे व संसारउपयोगी साहित्य भेट देवून या अनाथ कुटूंबाला जगण्यासाठी आधार दिला. या भेटीने कुटुंबाचेही डोळे पाणावले होते. सर्वच स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
ह्या दाम्पत्यांची मोठी मुलगी ऋतूजा हिचा विवाह पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिपंळगाव येथील जयदीप आरोळे या युवकाशी जुलै महिन्यात ठरलेला होता. विवाह प्रसंगी संसारउपयोगी साहीत्य देण्यात येणार आहे.
शेवगाव येथील माजी प्राचार्य दिलीप फलके यांनी मुलगा धनंजय याच्या शालेय शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तसेच वाघोली येथील युवक कार्यकर्ते उमेश भालसिंग हे वैयक्तिक ऋतूजाच्या लग्नातील संपूर्ण जेवणाचा खर्च करणार आहेत.
मराठा वर्ल्ड टीमचे सदस्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून निधी जमा करुन गाडे कुटूंबातील दोन नंबरची मुलगी प्रतीक्षा व मुलगा धनंजय यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी १५ हजार रुपये असे तीस हजार रूपये टाकले. त्याच्या पावत्या, फळे व मिठाई गाडे कुटूंबाच्या घरी जावून कुटूंबाकडे या सदस्यांनी दिली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved