अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्नाच्या आरोपाखाली अॅड. अभिजीत राजेश कोठारी व सासरे अॅड. राजेश मोहनलाल कोठारी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा न्यायालयाने सोमवारी अॅड.
अभिजीत राजेश कोठारी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. 26 मे रोजी अभिजीत अॅड. राजेश कोठारी व अॅड.राजेश मोहनलाल कोठारे यांनी अभिजीत यांच्या पत्नी सरिता अभिजीत कोठारी हीला लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्यामुळे सरिता हिचा हात मोडला होता.
दवाखान्यात दिलेल्या जबाबावरून पती अभिजीत कोठारी व सासरे राजेश कोठारी यांच्याविरुद्ध भा.द.वि. कलम 307, 323, 504, 506 सह 34 प्रमाणे नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल करणात आला होता. त्यामध्ये सोमवार दि.29 जून रोजी गुन्ह्याचे जिल्हा न्यायालयाने अॅड. अभिजीत कोठारी यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
यामध्ये सरकारी वकील अॅड. मुसळे व अॅड. पवार यांनी व स्वतः फिर्यादी सरिता अभिजीत कोठारी यांनी युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश एम.आर. नातू यांनी जामीन फेटाळला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews