अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हास्तरीय सर्व कामकाज पाहण्यासाठी नगरचे विधिज्ञ अभिषेक भगत यांची जिल्हा परिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी त्यांना या नियुक्तीचे पत्र दिले आहे. जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, माजी आ.चंद्रशेखर घुले आदिंनी अभिषेक भगत अभिनंदन केले आहे.
अॅड.भगत यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात जिल्हा परिषदेवतीने दिवाणी व फौजदारी कामे, औद्योगिक व कामगार न्यायालयातील कामे तसेच जिल्हा ग्राहक मंच, सहकार न्यायालयातील जिल्हास्तरीय सर्व प्रकारणांची कामे पाहणे.
विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग यांच्या न्यायालयातील कामकाज, जिल्हा परिषदेमधील सर्व खात्यांचे व खाते प्रमुखांकडील न्यायालयातील सर्व प्रकारणांचे कामकाज पाहणे,
न्यायालयीन विषयी सल्ला देणे व मार्गदर्शन करणे आदि जबाबदार्या अॅड.अभिषेक भगत यांच्यावर सोपविण्यात आलेल्या आहेत
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved