महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर ‘या’ पोलीस ठाण्याला मिळाले नवे साहेब

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- शेवगाव पोलीस ठाण्याचे तात्कालिन पोलिस निरीक्षक रामराम ढिकले यांच्या बदलीनंतर गेल्या एक महिन्यांपासून पोलिस निरीक्षक पद रिक्त होते.

ढिकले यांच्या जागी पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांची शेवगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अलीकडेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ प्रतापराव दिघावकर यांच्या पथकाने शेवगाव शहरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल 35 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यामुळे तालुक्यातील अवैध धंदे तसेच गुन्हेगारी रोखण्याचे मोठे अहवान पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील साहेब यांच्या समोर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe