अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यावर कोरोनाचा धोका वाढला आहे. यातच अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली.
यातच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठोपाठ खासदार सुजय विखे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यातच कोरोनावरील उपचारासाठी पुणे – मुंबईमधील मोठमोठे रुग्णालयांना डावलून विखे कुटुंबीय नगर जिल्ह्यातच उपचार घेत आहे.
राज्य मंत्रिमंडळातील बहुतेक सदस्य आणि राज्यातील बहुतेक आमदार सध्या करोना पॉझिटिव्ह आहेत. राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील सध्या करोना पॉझिटिव्ह आहेत.
त्यांच्यावर लोणी व अहमदनगर येथील त्यांच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिवाळी अधिवेशनानंतर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात एचआरसीटी स्कॅन केले.
येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नगर येथे सुरू असलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना दाखल करण्यात आले. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना
त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांनाही करोनाची लागण झाल्याने त्यांनाही नगर येथेच उपचारासाठी दाखल केले. काल खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांनीही नगर येथेच उपचार घेण्याचे पसंत केले.
राज्यात राजकीय नेते आजारी पडल्यास मुंबई व दिल्लीत उपचारासाठी दाखल झाल्याचे अनेकदा पहावयास मिळते. विखे पाटील यांनी मात्र आपला प्रवरा पॅटर्न परिपूर्ण असून जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेत असलेले आपले दोन्ही रुग्णालये सुसज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.
उपचाराच्या पुणे- मुंबई सारख्या उच्चभ्रू संस्कृतीचा बडेजाव न करता लोणी येथे सुरू असलेल्या रुग्णालयात उपचार घेत स्वतः निर्माण केलेली आरोग्य सुविधा परिपूर्ण असल्याचा संदेश विखे कुटुंबीयांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम