नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यानंतर ‘या’ गावात परत ड्रोनच्या घिरट्या ..! मात्र आता शूट आऊट…?

Published on -

Ahmednagar News : एक महिन्यापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. ड्रोनच्या भीतीने गावागावात रात्रीच्या वेळी तरुण जागे राहून गस्त घालत आहेत. याबाबत शासनाची कोणतीच यंत्रणा अधिकृत खुलासा करत नाही.

त्यामुळे रात्रीच्या वेळी आकाशात असे ड्रोनच्या घिरट्या घालत आहेत. याबाबत नागरिकांना प्रश्न पडला आहे याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेच उत्तर मिळाले नाही. मात्र या प्रकारामुळे नागरिकांना रात्रीच्यावेळी जागे राहावे लागत आहे .

मागील महिण्यात श्रीगोंदा तालुक्यात रात्रीच्या वेळी आकाशात असे ड्रोनच्या घिरट्या घालत असल्याचे नागरीकांनी सांगितले होते. अनेकांनी तर हे द्रोण पकडण्याचा देखील पप्रयत्न देखील केले होते.

दरम्यान आता पारनेर तालुक्यातील निघोज आणि परिसरातील गावांत तसेच वाडी-वस्तीवर दि. १६ रोजी रात्री दहा ते एकच्या दरम्यान ड्रोनच्या मोठ्या प्रमाणात घिरट्या वाढल्याने जनतेमध्ये घबराट पसरली आहे. जिल्हा प्रशासनाने याचा खुलासा करीत जनतेच्या मनातील भिती दूर करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

मंगळवार दि.१६ रोजी रात्री निघोज, गाडीलगाव, गुणोरे, देवीभोयरे, वडगाव गुंड, मोरवाडी, भांबरेमळा, रसाळवाडी, ढवणवाडी, वडनेर या परिसरात रात्री दहा ते एक वाजेपर्यंत ड्रोन आकाशात घिरट्या घालत आहेत. शेजारील पुणे जिल्ह्यातील वडनेर, टाकळी हाजी, माळवाडी, भाकरेवाडी या परिसरात सुद्धा गेली अनेक दिवसांपासून ड्रोन घिरट्या घालत आहेत.

याबाबत तेथील जनतेने वेळोवेळी पोलीस व तहसील प्रशासन यांना कळविले आहे. मात्र, आजपर्यंत कोणीही या ड्रोनची दखल घेतली नाही. विशेष म्हणजे हे ड्रोन सातत्याने या परिसरात लोकांचे लक्ष वेधत आहे. सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी ड्रोन पकडण्यासाठी ड्रोनगणचा वापर करण्यात येणार असून, याबाबत त्यांनी पुणे जिल्हाधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन यासाठी पंधरा लाख रुपयांची मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हाच प्रकार सातत्याने नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तसेच इतर तालुक्यातील गावात सातत्याने होत आहे. निघोज परिसरात तर मंगळवारी रात्री हे ड्रोन राजरोसपणे फिरत होते. याचा शोध घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News