शेवगाव :मंगळूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.शेवगाव तालुक्यातील एका मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली आहे.हि घटना रविवारी दि. ६ रोजी रात्री ९.३० वाजता झाली.मुला विरोधात त्याच्या आईने (अंबिका विठ्ठल केदार – वय ४८) यांनी पोलिसात तक्रार केली होती.त्या तक्रारीच्या आधारे,मुलगा सोपान विठ्ठल केदार (वय २४),रा.मंगळूर बुद्रुक,ता.शेवगाव याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
केदार पिता- पुत्र हे मंगळुर बुद्रुक,ता.शेवगाव येथील त्यांच्या शेजारी राहण्याऱ्या शहादेव तांदळे यांच्या बंद घराच्या गच्चीवर रात्री बसले होते.तेव्हा त्यांच्यात वाद झाला.बहिणीचे लग्न सांगण्याप्रमाणे का लावून दिले नाही आणि चुलत्यास सोडखरेदि करून दिलेली शेतजमीन सोडवून घेतली नाही,याच कारणामुळे त्यांच्यात वाद सुरु झाला.
मुलगा सोपान केदार याने वडील विठ्ठल केदार यांच्या चेहऱ्यावर,डोक्यावर,पोटात,छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि गच्चीवरून ढकलून दिले त्यामुळे विठ्ठल केदार यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यामुळे अंबिका केदार यांनी मुलगा सोपान केदार यांच्या विरुद्ध काल सोमवार दि.७ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.