Ahilyanagar Breaking: ‘ती’ विवाहित असूनही त्याच्या प्रेमात पडली : प्रेमाच्या नादात ‘तो’ मात्र घराण्याचा वंशाचा दिवाच विझवुन गेला

Published on -

Ahilyanagar Breaking : असे म्हणतात की प्रेमाला जातपात वयाचे बंधन नसते, प्रेम म्हणजे प्रेम असते. मात्र प्रेमाचे आयुष्य देखील फार नसते या ओळींची अनुभूती पाथर्डी तालुक्यातील घटनेने आली आहे.

एका विवाहित शेतात कामाला येणाऱ्या महीलेसोबत त्याच सुत जुळलं. मात्र तो अविवाहित होता दरम्यान मुलाच्या लग्नाच्या गोष्टी घरातली मंडळी करु लागली. याबाबत माहिती समजताच ते दोघेही १३ मार्च रोजी गावातुन पळुन गेले.

अन २२ मार्चला ती अर्धवट जळालेली व मृतदेह कुजलेला. तर जवळच त्याने तिचे स्कार्प व त्याचा पंचाची गाठ बांधुन झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, माळेगाव येथील एक विवाहीत महीला व दुलेचांदगाव येथील एक अविवाहीत युवकाच्या प्रेमात पडली. युवकाच्या शेतात कायम कामाला येत असल्याने तसेच या

महीलेच्या कुटुंबाचा व युवकाच्या कुटुंबाचा चांगला घरोबा होता. युवकाची परस्थीती आर्थिक सुबत्ता असलेली होती. आई-वडीलांना एकुलता एक असलेला
मुलगा विवाहीत महीलेच्या प्रेमात पडला. या महीलेला तीन वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान या युवकाच्या लग्नाबाबत कुजबुज महीलेला लागली. तिने युवकाला दुसऱ्याच्या मोबाईलवरुन फोन केले.

व ते दोघे १३ मार्च २०२५ रोजी गावातुन पळुन गेले. घरातील मंडळींनी व पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकाने फोनमधील समीकार्ड काढुन ठेवल्याने त्यांचा शोध घेण्यात अडथळे आले. २२ मार्च २०२५ रोजी सांयकाळी घुमटवाडीच्या डोंगरात महीलेचा मृतदेह अर्धवट जळालेला व काहीसा कुजलेला आढळला.

शेजारीच एका झाडाला त्याचा पंचा व तिचे स्कार्प याला गाठण मारुन युवकाचा मृतदेह फाशी घेतलेला आढळला. घटनेची माहीती समजताच पोलिस घटनास्थळी गेले. दोघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते.

शवविच्छेदन करुन दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.अंत्यसंस्कार करण्य़ात आले. मृत युवक आई-वडीलांना एकुलता एक होता.त्याला बहीण देखील नाही. आजोंबानी अतिशय लाडात वाढवलेला हा युवक प्रेमाच्या नादात त्यांच्या घराण्याचा वंशाचा दिवाच विझवुन गेला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe