अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन अॅड. उदय शेळके (वय- ४६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
सहकार आणि बँकींग क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँकेचे अध्यक्ष श्री. उदय गुलाबराव शेळके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुखःद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/49i4M7AFLw
Uday Shelke passed away— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 11, 2023
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) येथे अंत्यविधी होणार आहे.
उदय शेळके यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी काम केले.एकाच वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँका या दोन बलाढ्य बँकांचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली होती.
त्यांच्या निधनाची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पार्थिवावर पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन या गावी रविवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन कशामुळे झाले ? वाचा इथे