अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत झाली ! पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण ?

Updated on -

Ahmadnagar Breaking :- जिल्हा परिषद गट (Ahmednagar Zilla Parishad) व पंचायत समिती गणांसाठी (Panchayat Samiti) आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे, प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची, तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत झाली आहे. चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने तातडीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

नगर जिल्ह्या बाबत बोलायचे झाल्यास एकूण आरक्षणात 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव असणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या एकूण सर्वसाधारण 43 जागांमध्ये महिलांसाठी 22, ओबीसी 23 जागांमध्ये महिला 12, अनुसूचित जातीच्या 11 जागांमध्ये 6 महिला आणि अनुसूचित जमाती 8 जागांमध्ये 4 महिला अशा एकूण 85 जागांमध्ये 44 जागा महिलांसाठी राखीव असणार आहे.

असे होणार महिलांसाठी आरक्षण…
दरम्यान जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काढताना एकूण 85 गटांच्या चिठ्या टाकून त्यातून प्रथम 19 चिठ्या वेगळ्या काढल्या जातील. त्यात अनु. जातीसाठी 11 व अनु. जमातीसाठी 8 चिठ्या काढल्या जातील. उर्वरित चिठ्यांतून 23 ओबीसी चिठ्या वेगळ्या केल्या जातील. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या चिठ्ठ्या सर्वसाधारणच्या असतील. दरम्यान, त्या त्या प्रवर्गाचे आरक्षण झाल्यानंतर त्यातून निम्म्या चिठ्ठ्या वेगळ्या करून ते 50 टक्के आरक्षण महिलांसाठी असेल.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे आम्ही अपडेट करत आहोत तुमचे गट / गंन यादीत नसेल तर कृपया थोड्यावेळाने पुन्हा व्हिझिट करा

श्रीगोंदा तालुका पंचायत समिती गण आरक्षण २०२२-२७
१)देवदैठण गण-सर्वसाधारण
२)पिंपळगाव पिसा-ना.मा. प्रवर्ग महिला(BCC)
३)कोळगाव गण-ना.मा.प्रवर्ग(BCC)
४)घारगाव गण-सर्वसाधारण महिला
५)मांडवगण गण-सर्वसाधारण
६)भानगाव गण-अनुसूचित जाती महिला(SC)
७)आढळगाव गण-ना.मा. प्रवर्ग महिला(BCC)
८)पेडगाव गण-अनुसूचित जाती(SC)
९)येळपणे गण-सर्वसाधारण महिला
१०)बेलवंडी गण-सर्वसाधारण महिला
११)हंगेवाडी गण-सर्वसाधारण
१२)लिंपणगाव गण-सर्वसाधारण
१३)काष्टी गण-सर्वसाधारण
१४)अजनूज गण-अनुसूचित जमाती महिला(ST)

अकोले तालुका पंचायत समितीच्या १२ गणांची आरक्षण सोडत

१) समशेरपुर गण. — सर्वसाधारण ,
२) खिरविरे गण. — सर्वसाधारण ,
३) देवठाण गण. — अनुसूचीत जमाती महिला ( S T),
४) गणोरे गण. — अनुसूचीत जमाती महीला(S T),
५) धुमाळवाडी गण. — अनुसूचीत जमाती (S T),
६)धामणगाव आवारी — अनुसूचीत जमाती महीला (ST),
७) राजुर गण. —— अनुसूचीत जाती (SC) ,
८) वारंघुशी गण. —- सर्वसाधारण महिला,
९) पाडाळणे गण. —- सर्वसाधारण महिला,
१०) शेलद गण. —-सर्वसाधारण महिला
११) कोतुळ गण. —- अनुसूचीत जमाती ,
१२) ब्राम्हणवाडा गण. —-अनुसूचीत जमाती

राहुरी पंचायत समिती गणनिहाय आरक्षण
कोल्हार खु गण-सर्वसाधारण
सात्रळ गण-सर्वसाधारण
मांजरी गण -सर्वसाधारण
टाकळीमिया गण- अनुसूचित जाती महिला
उंबरे गण-अनुसूचित जाती महिला
मानोरी गण- अनुसूचित जाती-जमाती महिला
वांबोरी गण-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हणी गण-सर्वसाधारण महिला
गुहा गण-सर्वसाधारण
ताहाराबाद गण-सर्वसाधारण
बारागाव नांदूर गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
राहुरी खुर्द गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोपरगाव पंचायत समिती आरक्षण

धामोरी-सर्वसाधारण
सुरेगाव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हणगाव- अनु जमाती
शिंगणापूर-अनु.जाती
करंजी बु-सर्वसाधारण
दहीगाव बोलका- नागरीकांचा मागास प्रवर्ग
संवत्सर- अनु जाती महिला
कोकमठाण-सर्वसाधारण महिला

जेऊर कुंभारी-सर्वसाधारण महिला
कोळपेवाडी-अनु जमाती महिला
पोहेगाव-सर्वसाधारण,
रांजणगाव देशमुख – सर्वसाधारण महिला

कर्जत पंचायत समिती गननिहाय आरक्षण

निमगाव गांगर्डा – सर्वसाधारण महिला
मिरजगाव – सर्वसाधारण महिला
चापडगाव – सर्वसाधारण
टाकळी खंडेश्वरी – सर्वसाधारण महिला
कोरेगाव – सर्वसाधारण
आळसुंदे – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कुळधरण – अनुसूचित जाती महिला
बारडगाव सुद्रिक – सर्वसाधारण
राशिन – सर्वसाधारण
भांबोरा – नागरिकांचा मागास प्रवर्ग

पंचायत समिती, अ. नगर.

पंचायत समिती पारनेर

जामखेड

नेवासा

जिल्हा परिषद गट अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती आरक्षण

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News