अहमदनगर शहराचा ५३३ वा स्थापना दिन येत्या २८ मे रोजी साजरा होत आहे. यानिमित्त २६ ते २८ मे दरम्यान हेरिटेज वाॅक आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थापना दिन उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी २६ रोजी सकाळी साडेसहा वाजता विशाल गणेश मंदिर व माळीवाडा वेशीजवळ उपमहापौर गणेश भोसले यांच्या उपस्थितीत होईल.
२६ रोजी फराहबख्क्ष महाल नगर-सोलापूर रस्ता, रणगाडा संग्रहालयाजवळ २७ रोजी भुईकोट किल्ला आणि २८ रोजी बागरोजा साताळकर हॉस्पिटलच्या मागे येथे सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान “स्वागत अहमदनगर” तर्फे हेरिटेज वॉक होईल. सायंकाळी नगर ट्रेकर्सतर्फे हत्ती बारव नगर-जामखेड रस्ता परिसरात बारवांचे छायाचित्र प्रदर्शन आणि गाण्यांचा कार्यक्रम संध्या.5 ते 9 पर्यंत होणार आहे.

बागरोजा व हत्ती बारव येथे गाता रहे मेरा दिल ग्रुप हा कार्यक्रम मखदूम सोसायटी तर्फे सादर होईल अशी माहिती अॅड.अमीन धाराणी व आबीद खान यांनी दिली. २७ रोजी सकाळी ९ वाजता चित्रकार योगेश हराळे यांच्या आर्ट गॅलरीला सारसनगर भेट देण्यात येईल. स्थापना दिनानिमित्त आॅनलाईन छायाचित्र आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
या उपक्रमांसाठी आर्किटेक्टस् इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन आणि पोलाद स्टील जालना तसेच रामप्रसाद चिवडा यांचे सहकार्य लाभले असून एसाचे सभासद, तसेच अध्यक्ष अन्वर शेख, सचिव प्रदिप तांदळे, उपाध्यक्ष रमेश कार्ले, माजी अध्यक्ष आणि संचालक विजयकुमार पादिर यांच्यासह आशिष भाबडा (असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट पोलाद स्टील ) आणि विजय दगडे ( डिस्ट्रिक्ट सेल्स मॅनेजर पोलाद स्टील ) हे उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी पंकज मेहेर (मो. ९८९०९४९४१४ ) व अमोल बास्कर (मो ९८२२२९५११८) यांच्याशी संपर्क साधावा.