अकोले तालुक्यातील बेलापूर येथे तिरट नावाचा जुगार खेळताना १३ जण आढळून आले. दोन चारचाकी व नऊ मोटरसायकल असा ५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल अकोले पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबतची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, अकोले तालुक्यातील बेलापूर (भोसलदरा) गावात पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, उपनिरीक्षक दिपक ढोमणे, पोलीस नाईक विठ्ठल शरमाळे, कॉन्स्टेबल कुलदीप परबत यांच्या पथकाने घराच्या आडोशाला गायीच्या गोठ्यात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
याप्रकरणी मारुती विठ्ठल तांबे (वय ६१, रा. ओतूर, जिल्हा पुणे), नवनाथ बंसी शिंगोटे (वय ४१, रा. बदगी), बाळासाहेब म्हातारबा कुरकुटे (वय ३०, रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर), मुरलीधर सखाराम इंगळे (वय ४५, रा. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर, जिल्हा पुणे), विनायक रामचंद्र नलावडे (वय ५६, रा. धोलवड, ता. जुन्नर, जिल्हा पुणे),
समीर सुरेश सोंडकर (वय ३३, रा. आळेफाटा, ता.जुन्नर, जिल्हा पुणे), देविदास मारुती हांडे (वय ४२, रा. उंब्रज, ता. जुन्नर, जिल्हा पुणे), प्रभाकर वसंत डोंगरे
(वय ५५, ओतुर, जिल्हा पुणे), प्रशांत नंदकुमार हांडे (वय ३४, रा. उंब्रज, ता. जुन्नर, जिल्हा पुणे), जयसिंग दामू शिंगोटे (रा. बदगी, ता. अकोले), बाळासाहेब अशोक फापाळे (रा. बदगी, ता. अकोले), सचिन दत्तात्रय शेलार (रा. पिंपरी पेंढार, जिल्हा पुणे) व एक अज्ञात इसम या १३ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.