अहमदनगर ब्रेकिंग : १४ वर्षीय मुलीवर ५२ वर्षांच्या नराधमाचे अत्याचार , मुलगी गर्भवती राहिल्यानंतर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील एका चौदा वर्षीय मुलीवर ५२ वर्षे वयाच्या नराधमाने सातत्याने अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

याप्रकरणी आरोपी हिरामण संभा तिखोळे (वय ५२, रा.वडगाव सावताळ) यास अटक केली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडगाव सावता येथील १४ वर्षे पीडित मुलगी दररोज शेळ्या चारण्यासाठी जात असताना तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला गेला.

दरम्यान पीडित मुलीवर वारंवार झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपीवर बलात्कार व पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीत पीडित मुलीच्या आईने म्हटले आहे की आरोपी याने पिडीत मुलगी ही शेळी चारण्यासाठी गेली असता वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला व कोणालाही काही सांगायचे नाही अशी धमकी दिली. पिडीताही घाबरलेली असल्याने त्यावेळी तिने कोणालाही काही सांगितले नाही.

परंतु तिचे पोट दुखु लागल्याने पिडीतेच्या आईने तिला विश्वासात घेवून विचारले असता पिडितेने वरील हकिकत सांगितली. त्यानूसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment