अहमदनगर ब्रेकिंग : ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- जामखेड शहरातील गोरोबा टॉकीज परीसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

जामखेड तालुक्यातील हा कोरोनाचा चौथा बळी आहे. शहरातील कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढतच चालली आहे. आतापर्यंन्त जामखेड शहरात १९ रुग्ण आढळून आले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच जामखेड शहरातील गोरोबा टॉकीज परीसरात रहाणार्‍या एका ६५ वर्षीय महीलेची तब्येत बिघडल्याने तिला नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

यावेळी तीची कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आढळून आली. मात्र तीच्यावर उपचार सुरू असतानाच तीचा रात्री मृत्यू झाला आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment