अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- लग्नाचे आमिष दाखवून ओझर खुर्द येथील एका तरुणाने संगमनेर शहरात राहणार्या एका तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे.
हा प्रकार 2017 ते 2020 पर्यंत वारंवार होत होता. मात्र आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी अतुल शांताराम कदम (रा. ओझर खुर्द, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल कदम याने संगमनेर शहरातील साईश्रद्धा चौक परिसरात राहणार्या एका मुलीशी ओळख झाली होती.
त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर कदम याने एक पाऊल पुढे टाकत तिला लग्न करण्यासाठी मागणी घातली. व या दरम्यान त्याने तिला शिर्डी येथे नेले.
तेथे दर्शनाच्या नावाखाली आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आपण लवकरच लग्न करू असे सांगून त्यांच्यात 2017 ते 2020 पर्यंत वारंवार शरिरसंबंध होत राहिले.
दरम्यान, पीडित मुलीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली असता त्याने तिला बेदम मारहाण केली. व घरातून बाहेर काढून दिले. त्यानंतर हा प्रकार पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात कथन केला.
तिच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून पोलिसांनी तत्काळ खबरदारी घेत आरोपी कदम यास अटक केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved