अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ तालुक्यातील ४० गावांत कोरोनाचा शिरकाव; एकाच दिवशी ४० रुग्ण

Published on -

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे.

आता नेवासे तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला असून तालुक्यातील सुमारे ४० गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी ४० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

विशेष म्हणजे संपर्कातून बाधित वाढत असल्यामुळे आता तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. तालुक्यात अद्यापपर्यंत २१९ रुग्ण संक्रमित झाले असून त्यातील १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

१०३ रुग्ण उपचार घेत असून आजपर्यंत पाच रुग्ण दगावले आहेत. दरम्यान, शहरातील अनेक नगरसेवकांनी नेवासा शहरातील नागरिकांना काम असेल तरच बाहेर पडा, तोंडाला मास्क लावा,

व्यापाऱ्यांनी दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा नेवासा शहर बंद करण्याची वेळ आपल्यावर ओढवणार असल्याचा दावा सोशल मिडियाद्वारे केले जात आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe