अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरचे घर फोडले अमेरिकन डॉलर्ससह साडेआठ तोळे सोने व रोख रक्कम लंपास !p

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दि. १९ जानेवारी रोजी मंगळवारी गावच्या मध्यवस्तीत पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारतीचा लोखंडी दरवाजा तोडून ५०० परकीय डॉलर चलन, साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व ८० हजार रुपये रोख लंपास केले असून सदरील घटनेतील चोरटे सी सी टीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे.

याबाबत समजलेले सविस्तर माहिती अशी आहे की, शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे गावच्या मध्यवस्तीत दि. १९ च्या मंगळवारी पहाटेच्या दरम्यान चोरीची घटना घडली असून .

चापडगाव येथे डाॅ. ज्ञानेश्वर आंबादास दहिफळे यांचा बंगला आहे. डाॅ. दहिफळे हे पत्नीच्या प्रसुतीनिमित्त दहा दिवसांपासून आपल्या कुटूंबासह नगर येथे गेलेले होते.

याचाच फायदा घेत चोरट्यांनी बंगल्याचा पाठीमागील लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्यावर चोरट्यांनी बेडरूम मधील साहित्याची उचकापाचक करून चोरट्यांनी त्यातील ५ सोन्याच्या अंगठ्या,

गंठण, चैन असे अंदाजे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, बॅगेतील ५०० परकीय डॉलर चलन, रोख ८० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.

सदरील सर्व प्रकार सीसीटिव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा,

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून श्वानपथक व ठसेतज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment