अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील बोटा व परिसरातील गावांमध्ये बुधवारी पहाटे भूगर्भातील हालचालींचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
काही तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांमुळे पठारावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बाहेर करोना आणि घरात भूकंपाची भीती अशी अवस्था निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास बोटा व घारगाव, कोठे बुद्रुक परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकांनी सांगितले.
यापूर्वी २०१८ मध्ये घारगाव व बोटा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळेस घारगाव परिसरातील धक्के थांबले होते. मात्र, बोटा परिसरात भूगर्भातील हालचालींचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवले होते.
या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.वरिष्ठ भूवैज्ञानिक शास्त्रज्ञ चारुलता चौधरी यांनी बुधवारी जाणवलेल्या धक्क्याची नोद भूकंपमापन यंत्रावर झाली नसल्याचे सांगितले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम