अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- नगर-कल्याण रोड येथील सीनानदी पूल ते जाधव पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने पै. सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाच्या वतीने खड्डयात झाडे लावून गुलालाची उधळण करीत आंदोलन करण्यात आले.
अपघाताला कारणीभूत ठरणार्या सदर रस्त्याची तातडीने दुरुस्तीचे काम न झाल्यास येत्या सात दिवसात पुर्वसूचना न देता रास्ता रोको करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
या आंदोलनात संतोष शिंदे, योगेश चौधरी, छाया नागुल आदिंसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. सीनानदी पूल ते जाधव पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे.
महामार्गाचा दर्जा असून, देखील या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सात दिवसापुर्वी झालेले पॅचिंगचे काम पुर्णत: उखडले असून, खड्डेमय रस्त्यावरुन नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, या रस्त्याची दुरुस्ती करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved