अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणे महामार्गावरील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनीच्या शेडचे काम सुरु होते. या कामादरम्यान शेडवरुन पडून मुश्ताक सलीम शेख (वय १९) या तरुणाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी त्याचेव वडिल सलीम मुजीम शेख (वय- ४०, धंदा मजुरी, रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) यांनी फिर्याद दीली. त्यादिवशी तब्बल पाचव्या दिवशी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुपा एमआयडीसीमधील सुपर फाईन या कंपनीत दि. १५ जून रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कंपनीचे सुरु होते. या कामावर मुश्ताक सलीम शेख याला पत्रा फिटिंग कामाचे कुठलेही ज्ञान नव्हते.
तरीही त्याला हेल्पर म्हणून कामास घेण्यात आले. ठेकेदार ज्ञानेश्वर भाऊसाहेब कोराळे (रा. वडगाव गुप्ता ता. जि. अहमदनगर) याने सुरक्षेच्या दृष्टीने काही एक साधन सामग्री उपलब्ध करुन दिली नाही.
तसेच त्याला पत्रा बसविण्याचे ज्ञान नसताना त्यास हयगयीने आणि अविचाराने पत्र्याचे शेडवर चढविले. दरम्यान, त्याच्या मृत्युस कारणीभूत झाल्याप्रखरणी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सुपा औद्योगिक वसाहतीचा नव्याने विस्तार होत आहे. यापूर्वीदेखील कंपनीमध्ये काम सुरु असताना अनेक वेळा अपघात झालेले आहेत. यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
या तरुणांच्या मृत्युला कंपनी व्यवस्थापकच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. यानिमित्ताने कंपनी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या अपघाती घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews