अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा डोक्यात दगड घालून एकाचा खून

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- नगर तालुक्यातील वाळकी येथे दोन शेजा-यांमध्ये सायकल लावण्याच्या कारणातून वाद झाले आहेत.

या वादात जावेद गनीभाई तांबोळी वय ३८ या नावाची व्यक्ती मयत झालीअसल्याचे प्राथमिक माहिती नगर तालुका पोलिसांना समजली आहे. घटनास्थळी नगर तालुका पोलिस दाखल झाले आहेत.

नगर तालुक्यातील वाळकी येथील भांड्याचे व्यापारी गणीभाई यांचा मुलगा जावेद याचा भरदिवसा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला.

या घटनेमुळे वाळकी पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे किरकोळ कारणातून ही घटना झाल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe