अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात पाळणार जनता कर्फ्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :नगर शहरासह अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाने आता आपले हातपाय पसरले आहेत.दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे.

या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे जाहीर केले आहे.

सध्या अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे ही परिस्थिती आटोक्यात

आनण्यासाठी कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार यांनी सर्व प्रशासकीय विभागप्रमुखांशी चर्चा करून दि.१६ ते १८ जुलै हे तिन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे जाहीर केले आहे.

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील. अशी माहिती तहसीलदार नाईकवाडे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe