अहमदनगर ब्रेकिंग : वाहनाखाली चिरडून युवकाचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- नगर-मनमाड महामार्गावर चिंचोलीजवळ भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाखाली काल सायंकाळी ५ वाजता चिरडून एका युवकाचा जागेवर मृत्यू झाला.

अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन तेथून पसार झाले. नगर-मनमाड महामार्गावर कोल्हार हद्दीत व चिंचोलीजवळ असलेल्या जगताप पेट्रोल पंपाजवळ राहुरीकडून शिर्डीकडे भरघाव वेगाने जात असलेल्या एकाअज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास चिरडल्याने सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला.

प्रमोद रावसाहेब वर्पे (वय २७)असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव असून ते चिंचोलीजवळील गंगापूर येथील रहिवाशी आहे. सदर युवक एका कृषीसेवा केंद्रात कामास होता.वाहनाने जोराची धडक दिल्याने युवकाचा चिरडल्याने जागीच मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment