Ahmednagar News : अहमदनगरकरांनो तुमच्या मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरु ! का व कशासाठी ? पहा..

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुमारे १ लाख ४० हजार मालमत्तांचे घर टू घर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

मे.सी.ई. इंन्फो सिस्टीम, नवी दिल्ली या संस्थेमार्फत हे काम सुरू असून प्रायोगिक तत्त्वावर शहर व सावेडी उपनगर परिसरातील दोनशे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

मनपा प्रशासनाकडून घेतलेल्या मोजमापांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले. महापालिकेमार्फत यापूर्वी सन २००४-२००५ या आर्थिक वर्षात सर्वेक्षण, मूल्यांकन निश्चिती होऊन मालमता कर आकारणी करण्यात आली आहे.

त्यानंतर काही वर्षांपूर्वी कोलकाता येथील एका संस्थेमार्फत जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून काम सुरू झाले होते. मात्र, ते अर्धवट अवस्थेत बंद केले गेले. आता मालमत्तेची डिजीटल छायाचित्रे,

जिओ टॅगींग तसेच डिजीटल उपकरणांद्वारे मोजमाप करण्यात येणार आहे. तसेच, संपूर्ण कर आकारणी प्रणालीचे संगणकीकरण केले जाणार आहे. यामुळे आता करचुकवेगिरी करणारे, किंवा नोंदी नसणाऱ्या मालमत्ता आदींची माहिती देखील मिळणार आहे.

मोजमापे..पडताळणी..कार्यवाही..

गेल्या काही दिवसांत संस्थेने सावेडी उपनगर व मध्य शहरातील दोनशे मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्यांची छायाचित्रे व मोजमापे घेतली आहेत. सर्वेक्षणात मोजमापांसह मालमत्ता निवासी आहे की व्यावसायिक, त्याचा वापर कशासाठी होत आहे,

सध्याचे रहिवासी भाड्याने राहतात की मालक स्वतः राहतात, यापूर्वी किती कर भरला आहे आदी विविध मुद्द्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. मोजमापे घेतलेल्या दोनशे मालमत्तांच्या नोंदींची पडताळणी प्रशासन करणार आहे. त्यानंतर पुढील कामकाज सुरू होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe