अहमदनगर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Published on -

Ahmednagar News : आज देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. राजधानी दिल्लीसह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सालाबाद प्रमाणे पक्ष कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके व माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दादाभाऊ कळमकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, मा.आमदार प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर , प्रदेश सरचिटणीस अशोक बाबर , जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके ,जिल्हा उपाध्यक्ष सीताराम काकडे ,

नगर तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डीले,उपाध्यक्ष सुदामराव भोसले, प्रा.माणिकराव विधाते, सरचिटणीस सुरेश साठे , अभिषेक जगताप, आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe