अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा ८ हजारांच्या पार गेला आहे.
परंतु यात अहमदनगर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. एकट्या अहमदनगर शहरात 2 हजार 329 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
त्यांच्या संपर्कातील तब्बल 3 हजार 210 नगरकरांना प्रशासनाने होम क्वारंटाईन करून ठेवले आहे. त्यातील 360 बाधित उपचार घेत आहेत. तर 44 जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेने 6 हजार 697 संशयितांची तपासणी केली. या तपासणीत 2 हजार 329 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. कोरोनातून बरे झालेले आणि करोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग महापालिकेने केले आहे.
या दोघांसोबतच लक्षणे असलेले असे एकूण 3 हजार 210 नगरकर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शोधले. त्या सगळ्यांना सात दिवसांसाठी घरातच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्याचा विचार करता कोरोना रुग्णांचे संक्रमणाचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. ही साखळी तुटणे गरजेचे आहे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खा.सुजय विखे तसेच आ.बबनराव पाचपुते यांनी लॉक डाऊनची मागणी केली होती. परंतु प्रशासनाने ती नाकारली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved