Ahmednagar News: अहमदनगर शहराला एक ऐतिहासिक परंपरा असून या शहराचे नाव आता अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असे करण्यात आले असून याबाबत आता केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर राज्य शासनाने 4 ऑक्टोबर 2024 रोजी याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले असून आता जिल्ह्याच्या नामांतराच्या अंमलबजावणी संदर्भातील पुढील प्रक्रिया स्थानिक प्रशासन सोमवारनंतर सुरू करण्याची शक्यता आहे.
कारण शनिवारी व रविवारी सुट्टी असल्या कारणाने पुढील प्रक्रिया ही सोमवारनंतरच सुरू होईल. राज्य शासनाच्या माध्यमातून याविषयीचे राजपत्र शुक्रवारी रात्री उशिरा प्रकाशित केले.
परंतु प्रकाशित केलेल्या या राजपत्रानुसार बघितले तर यामध्ये केवळ अहमदनगर शहराच्या नावात बदल करण्यात आला असून जिल्ह्याच्या नावात अद्याप बदल करण्यात आलेला नसल्यामुळे ही प्रक्रिया आता कशी राहील याबाबत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
अहमदनगर शहराचे नाव झाले अहिल्यानगर, पण जिल्ह्याच्या नावात केव्हा होणार बदल?
अहमदनगर शहराचे नाव आता ‘अहिल्यानगर’ झाले असून, याबाबत केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य शासनाने ४ ऑक्टोबर रोजी राजपत्र प्रसिद्ध केले आहे नामांतराच्या अंमलबजावणीसंदर्भातील पुढील प्रक्रिया स्थानिक प्रशासन सोमवारनंतर सुरू करणार आहे.
शासनाने शुक्रवारी रात्री उशिरा राजपत्र प्रकाशित केले. मात्र, यात केवळ ‘अहमदनगर’ शहराचे नाव बदलण्यात आले आहे. जिल्ह्याच्या नावातील बदल अद्याप झालेला नाही.जिल्हा व तालुक्याचे नाव बदलण्याबाबत महसूल विभाग नोटिफिकेशन काढेल, त्यावर हरकती मागवल्या जातील व नंतर जिल्ह्याचे नाव बदलेल, असे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी सांगितले.
शासनाच्या राजपत्रात नवीन नाव मराठी व इंग्रजीत कसे असेल याबाबतचा उल्लेख आहे. दरम्यान, नवीन नावाप्रमाणे महापालिकेने अद्याप आपल्या नावात बदल केलेला नाही. यासंदर्भात आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, शासनाने राजपत्र प्रकाशित केले आहे. ते आमच्या कार्यालयात येईल. त्यानंतर स्थानिक पातळीवर अंमलबजावणी केली जाईल.
महापालिकेला शनिवारी व रविवारी सुटी असल्याने सोमवारनंतर महापालिका याबाबत अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने या आदेशाची प्रसिद्धी करावी असे राजपत्रात म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना या निर्णयाबाबत अवगत करून बदलाचे आवाहन केल्यानंतर नागरिक या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करतील.