अहमदनगर शहरातील पाणी आता झाले महाग !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील पाणीपट्टीमध्ये 10 टक्के वाढ झाली आहे, सध्या दीड हजार रुपये वार्षिक पाणीपट्टी आहे, त्यात 10 टक्के वाढ करण्यात आली.

प्रशासनाने दुप्पट वाढ सुचविली होती, मात्र ती फेटाळण्यात आली. अर्धा इंच, पाऊण इंच, एक इंच असे नळजोड आहेत.

त्यात अर्धा अन पाऊण इंचला दीड हजार आणि तीन हजार पाणीपट्टी आहे, तर एक इंचला 6 हजार आहे. या सर्व दरात 10 टक्के वाढ करण्यास स्थायी समितीच्या आज झालेल्या सभेत मान्यता दिली आहे.

फेज टू चे काम पूर्ण होऊन पूर्ण दाबाने सगळीकडे पाणी येऊ लागल्यानंतर परत पाणीपट्टीत वाढ करू, असे सांगत प्रशासनाची दरवाढ फेटाळण्यात आली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment