Ahilyanagar News : पारनेरचा मौलाना ‘यांना’ वाचवतोय ! व्यापाऱ्याच्या मुलीला मारले, आ.जगताप भडकले

Published on -

अहिल्यानगर : कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी दिनांक २९ रोजी १० ते १५ गुंडांकडून मारहाण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज (दि.१ एप्रिल ) आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत कारवाईची मागणी करण्यात आली.

आ. संग्राम जगताप म्हणाले की कापड बाजार येथे पोलीस चौकी उभी करावी, जेणे करून गुंडांवर आळा बसेल, महिलांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. पारनेर वरून तो मौलाना येत असून पाठीशी घालण्याचे काम करत आहे. त्यांना देखील सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.

कापड बाजार मधील व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करण्यात आली असून व्यापाऱ्यानी पोलिस अधीक्षकांची भेट घेत निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अमोल गाडे, डॉ. सागर बोरुडे, संतोष ढाकणे, बलदेवसिंग वाही, प्रदीप पंजाबी आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, २९ मार्च रोजी संध्याकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान एम. जी. रस्त्यावर गुरनुरकौर परमिंदरसिंग नारंग यांच्या कापड दुकान समोर रस्त्यावर गाडी लावणारे आरोपी आजमत उर्फ अजू खान यास दुकानास अडथळा होत असल्याचे सांगितले असता तक्रारदार मुलीची छेडछाड करुन, शिवीगाळ करून, मारहाण केली. तसेच तिचा भाऊ स्लोक दिपसिंग यास लोखंडी स्टुलने मारहाण केली.

आरोपीचा भाऊ आर्शद आसिफ खान, आदनान नदिम शेख, शाहिद पिंजारी यांनी आणि त्यांच्या समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक जमा करून या कुटुंबाला अमानुष मारहाण केली होती. त्याबाबत कोतवाली पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी व त्यांच्या समाजातील इतर गुंड प्रवृत्तीच्या ठराविक लोकांना जमा करुन नेहमीच व्यापाऱ्यांवर दहशत करतात.

दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक दुसऱ्या समाजावर हल्ले करून दहशत निर्माण करतात. ज्या ठिकाणी घटना घडली, तो भाग नो हॉकर्स झोन आहे. तरीही हे लोक सदर रस्त्यावर जाणुनबुजून अतिक्रमण करून दुकानासमोर त्यांच्या हातगाड्या लावतात. तसेच स्थायिक दुकान असणाऱ्या व्यापाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करून दहशत करतात. या बाबींकडे पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासन नेहमीच डोळेझाक करत आहेत.

त्यामुळे या समाजाची दहशत जास्तच वाढत चालली आहे. संपूर्ण एम.जी. रोड व घासगल्ली रस्त्यावर या लोकांनी अतिक्रमण करत हातगाड्या लावुन वाहतुकीस अडथळा करत आहेत. अनेक मोठे व्यापारी जे शासनास लाखो, करोडोचा टॅक्स भरतात, त्यांच्या दुकानासमोर हातगाड्या लावुन व्यापाऱ्यास, दुकान व्यवसायात अडथळा करुन त्रास देतात.

दादागीरी करून ‘हमारे आदमी इकठ्ठा करके तुमको मार डालेंगे’ अशा धमक्या देतात. या भागात रमजानचा महिन्यात सुद्धा पोलिस प्रशासनाने पेट्रोलिंग केलेली नाही, बंदोबस्तही नव्हता. गेल्या महिन्यात एवढी मोठी घटना होऊनही त्यावेळी एकही पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी आला नाही.

यापूर्वीही हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या याच समाजाच्या लोकांनी दिपक नवलानी यांच्या दुकानात घुसून त्यांना चाकुने भोसकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. तरीही अजून प्रशासनाला जाग आली नाही. या समाजाची या भागात मोठी दहशत निर्माण झालेली आहे. या रोडवर अतिक्रमण करून, दादागीरी करून व्यापाऱ्यांमध्ये मितीचे वातावरण निर्माण केलेले आहे.

या अतिक्रमणधारकांमध्ये बरेच बांग्लादेशी नागरिक दिसून येतात. त्यामुळे त्यांची ओळख पटवणेसुध्दा शक्य होत नाही. अशा घटनांमुळे दोन समाजात विनाकारण तेढ निर्माण होऊन भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अशा गुंड व नंगड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुढील अनर्थ निश्चितच टळला जाईल. तरी वरील आरोपींविरुध्द त्वरीत कडक कारवाई करण्यात यावी तसेच सदर भागात हातगाडीधारकांनी नो हॉकर्स झोन असतानाही के लेले अतिक्रमण काढून त्वरीत शांतता प्रस्तापित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe