अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- पोलीस निरिक्षक नितीन गोकावे यांना अकार्यकारी दलात नोकरी देण्याचे आदेश असल्याने, त्यांची कोतवाली पोलीस स्टेशन वरून साईड ब्रँच शिर्डी वाहतूक येथे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे(नाशिक परिक्षेत्र)यांनी बदली केली होती.
परंतु त्यांना पुन्हा सुपा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे विरुद्ध विविध तक्रारीचा अर्ज करून पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्याकडे केडगाव येथील उद्योजक महेश भांबरकर यांनी तक्रारअर्ज दाखल केला आहे.
पो.नि.नितीन गोकावे हे पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाराचा गैरवापर करून वेगवेगळ्या कारणावरून त्रास देणारे अधिकारी असून त्यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड शिर्डी वाहतूक याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर घटनेबाबत जबाब देऊनही गोकावे यांच्यावर काहीही कार्यवाही झाली नाही.त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याची सवय आहे.या सर्व बाबींला अनुसरून पो.नि.नितीन गोकावे यांची सुपा पोलीस स्टेशन येथे झालेली बदली तात्काळ रद्द करावी.अशी मागणी उद्योजक महेश भांबरकर यांनी केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com