अहमदनगर : नगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाच्या दुरुस्ती कामांसाठी महापालिकेमार्फत शनिवारी (दि.१२) सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे याकाळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी (दि.१२) पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
शनिवारी बोल्हेगांव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर व स्टेशनरोड, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास (सकाळी ११ नंतरच्या पाणीवाटपाच्या भागास) पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. परिणामी रविवारी (दि.१३) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या भागास म्हणजेच मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर याभागात व गुलमोहररोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसिपल हाडको इत्यादी परिसरात महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

याभागातील पाणीपुरवठा हा रविवारऐवजी सोमवारी (दि.१४) करण्यात येईल. तसेच सोमवारी पाणीपुरवठा होऊ घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा. सर्जेपूरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळेरोड, ख्रिस्तगल्ली, कापडबाजार, माळीवाडा, बालिकाश्रमरोड परिसर याभागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवारी (दि.१५) करण्यात येईल.
शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करुन उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे, अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करुन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक














