अहमदनगर : नगर शहर विकास योजनेतील दिल्लीगेट रस्ता रुंदीकरणासाठी मनपाने प्रशासकीय सोपास्कर पूर्ण केले आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून फोटोसेशन केले. तथापि, रस्ता रुंदीकरणाची अंमलबजावणी झालेली नाही. महापौरांनाही या रस्त्याचा विसर पडला आहे.
आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे असताना त्यांनी दिल्लीगेट भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाकडे लक्ष केंद्रीत केले होते. मात्र, नगरकरांनी वेस पाडण्यास विरोध केला. त्यानंतर आयुक्तपदी श्रीकृष्ण भालसिंग हजर झाल्याने हा विषय मागे पडला. आयुक्त भालसिंग व महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जूनमध्ये या रस्त्याची संयुक्त पाहणी केल्यानंतर पुन्हा हा विषय रडारवर आला.
पहिल्या टप्प्यात दिल्लीगेट ते चौपाटी कारंजा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. दिल्लीगेट-चौपाटी कारंजा-जुनी महापालिका ते थेट जीपीओ चौक असा हा रस्ता ५० फुटांचा होणार आहे. अतिक्रमणांमुळे काही ठिकाणी हा रस्ता दहा ते पंधरा फुटांचाच उरला असल्याने वाहतूक कोंडी होते. पहिल्या टप्प्यातील रुंदीकरणात अडथळे ठरणाऱ्या चार-पाच इमारतींच्या मालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. उपअभियंता सुरेश इथापे यांना विचारले असता त्यांनी बाधित मालमत्ताधारकांना एफएसआय दिला जाईल, असे सांगितले.
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..