अहमदनगर :- ऍड.स्वाती शाम नगरकर यांची भारत सरकारकडून नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सदरची नियुक्ती आजपासून (गुरवार) देण्यात आली आहे. त्यांनी विविध ठिकाणी वकील म्हणून काम पहिले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दाखल घेत त्यांना हि नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल विविध मान्यवर क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक,व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
