नगर शहरातून शिवसेना-भाजपा युतीची उमेदवारी माजी आमदार अनिल राठोड यांना पुन्हा मिळाली आहे. उद्या ते अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली.
भाजप व सेना एकत्रित लढत असल्यामुळे आता सर्वांचीची मोट सेनेला बांधावी लागणार आहे. मागील काही काळात राठोड व गांधी यांच्यात सुरू असलेला संघर्ष लक्षात घेता ही मनधरणी सुरु झाली आहे. एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा गांधींवर आगपाखड करणारे राठोड समर्थक गांधी यांच्या घरी जावून आले आहेत. पण अद्याप त्यात यश आले नसल्याचे समजते.

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान दिलीप गांधी यांच्या नावाला राठोड यांनी जाहीर विरोध दर्शविला होता.त्यामुळे गांधी व राठोड यांच्यातील वाद आणखीच चिघळला. गांधी यांनीही राठोड सेनेचे उमेदवार असतील तर आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा दिला होता.मागील आठवड्यात राठोड यांनी आले तर त्यांच्यासह व न आल्यास त्यांच्याशिवाय असे सूतोवाच पत्रकार परिषदेत केले होते. मात्र आता राठोड यांना उमेदवारी मिळार्लयाने त्यांच्या समर्थकांनी गांधी यांची मनधरणी सुरु केली आहे.
- 801 किमी नाही, आता 840 किलोमीटर…..; 11 ऐवजी ‘या’ 13 जिल्ह्यांमधून जाणार नवा शक्तीपीठ महामार्ग !
- पुणे मेट्रो बाबत महत्त्वाची अपडेट ! 27 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीस यांनी दिली माहिती
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! देशातील ‘या’ चार बँकांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला आरबीआयची मंजुरी
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केवायसी केल्यानंतरही ‘या’ महिलांना लाभ मिळणार नाही
- राज्यातील सोयाबीन आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय













