तक्षिला स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अहमदनगर ;- तक्षिला स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडले. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक विश्‍व व अनेक गोष्टी या विषयावर बहारदार कार्यक्रम सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विश्‍वनिर्मितीचे रहस्य उलगडले. यामध्ये अश्मयुगीनपुर्वीच्या डायनासोर युगाची झालेली निर्मिती व त्याचा नाश, विविध धर्माच्या धर्मगुरुंनी दिलेली शिकवण तर मनुष्याने स्वत:च्या स्वार्थासाठी प्रदुषण करुन ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीचे दर्शन या कार्यक्रमातून घडविले. मनुष्याने वृक्षतोड करुन जलप्रदुषण, वायूप्रदुषण, ध्वनीप्रदुषण करीत निसर्गाचा समतोल बिघडविला असून, विश्‍वाच्या संरक्षणासाठी प्रदुषण थांबवून व झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

मनुष्याने शिक्षण घेऊन विज्ञानाद्वारे औद्योगिक क्रांती केली. मात्र देशादेशात शस्त्रांच्या स्पर्धा निर्माण होऊन अणुबॉम्बची निर्मिती करुन जगाचा विनाश स्वत: मनुष्य करायला निघाला असल्याचे सादरीकरण नाटिकेतून केले. तसेच रामायण, अरेबीयन नाईट, अली बाबा चाळीस चोर आदी नाटकांनी उपस्थितांची मने जिंकली. पालकांनी मुलांच्या कलागुणांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. स्कूलच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे पालक शिक्षक संघाचे सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भविष्य निर्वाह निधीचे सहा. आयुक्त अभिषेक कुमार मिश्रा उपस्थित होते.

मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांसह आई-वडिलांचा सन्मान व आदर बाळगण्याचे आवाहन करुन उत्कृष्ट व नियोजनबध्दपणे सादरीकरण केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले. प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांनी वार्षिक अहवालात शाळेचा कला, शैक्षणिक, क्रीडा व स्पर्धा परिक्षेतील गुणवत्ता वाढीचा उंचावत चाललेला आलेख मांडला.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तर मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना 2500 रु. तर विविध विषयात पहिल्या आलेल्या मुलींना 2100 रुपये तसेच इयत्ता 1 ली ते 11 वी मध्ये प्रथम आलेल्या मुलींना 1100 रुपयाचे रोख बक्षिस देण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचा देखील यावेळी सत्कार झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक व शिक्षकेतर प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment