स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी : महापौर वाकळे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या अभियानात अहमदनगर मनपाने भाग घेतला आहे.

मागील वर्षी महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भाग घेतला होता. लोकसहभागामुळे त्यात महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी केलेल्यामुळे देशात ४० वा क्रमांक मिळवला. त्यामुळे स्वच्छतेत नगरचे नाव देशपातळीवर झळकले.

स्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडते.

त्यामुळे यावेळी देखील नगरकरांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या उपक्रमांसाठी साथ देऊन नगर शहर देशात टॉपटेन करावे, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment