अहमदनगर महाविद्यालयाचा एम.एस.सी कॉम्प्युटर सायन्सचा 100 टक्के निकाल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- पुणे विद्यापीठाच्यावतीने नुकतीच जाहिर झालेल्या एम.एस.सी कॉम्प्युटर सायन्स परिक्षेमध्ये अहमदनगर महाविद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल 100 टक्के लागला असून यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.सय्यद रज्जाक, उपप्राचार्य ए.व्ही.नागवडे, डॉ.बी.एम.गायकर सर्व विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना उप्राचार्य डॉ.सय्यद रज्जाक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

एमएससी कॉम्प्युटर सायन्स विभागात कु.प्रतिक्षा नितीन बोरा हिने 82.50 टक्के मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला तर केशर डोळसे हिने 78.60 टक्के गुण मिळवुन द्वितीय क्रमांक मिळवला आणि कु.गौरी नगरकर हिने 78.5 टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावला.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे.बार्नबस म्हणाले कि, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात महाविद्यालय आणि प्राध्यापक नेहमी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन दर्जेदार शिक्षण देत आहेत. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सध्या महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. प्राध्यापकही ऑनलाईनच्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याबाबत काळजी घेण्यात येत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे टप्प्याटप्याने वर्ग सुरु करण्याबाबत महाविद्यालयाने तयारी केली आहे, त्यामुळे ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे शिक्षण सुरु असल्याचे सांगून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment