अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे काम केल्यामुळे नगर शहरात विकास कामे दिसू लागली आहे.
विकास कामात कोणीही पक्षीय राजकारण आणू नये. नगर शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे. शहरातील प्रभागामध्ये विकास कामे व्हावी, यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता असते.

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी गेल्या ६ वर्षांपासून बोल्हेगाव परिसरामध्ये त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच विविध विकासकामे मार्गी लागली आहे. या भागामध्ये मुलभूत प्रश््नांपासून विकास कामे करणे बाकी होते.
ते आज सोडविण्यात आली आहे. विकास कामाबरोबर सामाजिक प्रश्न सोडविण्यात कायम आग्रही असतात, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्र. ७ मध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक रवींद्र बारस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुमारसिंह वाकळे म्हणाले की, आ. जगताप यांच्या माध्यमातून प्रभागातील विविध विकासकामे मार्गी लावली आहे. विकासकामांतून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
त्यामुळे या भागातील नागरिकांनी मला दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. प्रभागातील विकासकामे दर्जेदार व्हावी, यासाठी कामावर प्रत्यक्ष उभे राहून चांगल्या दर्जाचे काम करून घेतल्यामुळे अनेक वर्षे ही कामे टिकलेली आहेत.
विकासकामाबरोबर प्रभागात नागरिकांना बरोबर घेऊन वृक्षांची लागवड करुन त्याच्या संवर्धनाची कामे केली जातात. प्रभागत लावलेल्या वृक्षांची जतन करुन त्यांचा वाढदिवस साजरा केल्यामुळे नागरिकांचे वृक्षाशी आपुलकीचे नाते निर्माण होते.
असे ते म्हणाले. फोटो ओळी नगर : प्रभाग क्र. ७ मध्ये नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक रवींद्र बारस्कर आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews