अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे सोमवार पासून जिल्हा दौऱ्यावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षांच्या मागील महिन्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांनी श्रीगोंद्याचे युवानेते स्मितल भैय्या वाबळे यांची जिल्हाध्यक्षपदी तर उत्तर नगर

कार्याध्यक्षपदी सुभाष सांगळे व दक्षिण नगर कार्याध्यक्ष पदी राहुल उगले यांची नियुक्ती करून सदर निवडीचे पत्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक भक्कम होण्याच्या दृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये युवकांची मोठी फळी तयार करण्याची जबाबदारी नूतन जिल्हाध्यक्ष स्मितलभैया वाबळे यांनी घेतली असून

आगामी संघटन वाढीच्या निमित्ताने सोमवार दिनांक 21 डिसेंबर पासून उत्तर व दक्षिण नगरचे सहकारी कार्याध्यक्ष सुभाष सांगळे व राहुल उगले यांच्यासमवेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करून होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संधी व जस्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्याच्या दृष्टीने सदर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेस प्रांताध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे , आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, महिला प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस अनुराधाताई नागवडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, माजी महापौर ज्येष्ठ नेते दीप चव्हाण ,युवक काँग्रेस व एनएसयूआयचे समन्वयक किरण काळे आदींच्या मार्गदर्शनाखाली सदर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मा. जिल्हाध्यक्ष यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे असेल,

सोमवार दिनांक २१ डिसेंबर

  • स.१०.०० वा. नेवासा तालुका युवक काँग्रेस
  • स.११.३० वा. श्रीरामपूर तालुका व शहर युवक काँग्रेस
  • दु. १.०० वा. कोपरगांव तालुका व शहर युवक काँग्रेस
  • दु. २.३० वा. राहाता व शिर्डी युवक काँग्रेस

मंगळवार दिनांक २२ डिसेंबर

  • स.१०.०० वा. अकोले तालुका युवक काँग्रेस
  • दु.१२.०० वा. संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेस

बुधवार दिनांक २३ डिसेंबर

  • स.१०.०० वा. नगर तालुका युवक काँग्रेस
  • स.११.३० वा. राहुरी तालुका व देवळाली युवक काँग्रेस
  • दु. १.०० वा. पाथर्डी तालुका व शहर युवक काँग्रेस
  • दु. २.३० वा. शेवगांव तालुका युवक काँग्रेस

शुक्रवार दिनांक २५ डिसेंबर

  • स.१०.०० वा. पारनेर तालुका युवक काँग्रेस
  • दु.१२.०० वा. कर्जत तालुका व शहर युवक काँग्रेस
  • दु. २.३० वा. जामखेड तालुका व शहर युवक काँग्रेस

वरील प्रमाणे नूतन जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष हे अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करणार असून संबंधित तालुक्याचे अध्यक्ष, शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी नोंद घेऊन

या बैठकीदरम्यान तालुक्यातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांच्यासह युवक पदाधिकारी यांना निमंत्रित करावे व बैठकीचे ठिकाण जिल्हाध्यक्ष यांच्या 99 23 49 33 33 या क्रमांकावर कळविण्यात यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment