Ahmednagar News : मागील अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्हाविभाजन मुद्दा चर्चेत आहे. आता नुकत्याच पंतप्रधानांच्या झालेल्या शिर्डी दौऱ्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
अहमदनगर जिल्हा विभाजनाचे मागील अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. आता पुन्हा एकदा श्रीरामपूर हे जिल्ह्याचे केंद्र व्हावे अशी मागणी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने केली आहे.
विभाजनानंतरचा वाद ?
सध्या जिल्हा विभाजन होणे गरजेचेच आहे. कारण सध्याचा भौगोलिक पसारा पाहता प्रशासकीय कामकाज सुरळीत व्हावे यासाठी विभाजन गरजेचे आहे.
परंतु जिल्ह्यासह केंद्र कोणते असावे यावरून वाद निर्माण होऊ शकतो असे म्हटले जात आहे. कारण मध्यंतरी जिल्ह्याचे केंद्र शिर्डी होईल अशी चर्चा होती. पण श्रीरामपूरकर मात्र यानंतर आक्रमक झाले होते.
श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचा आग्रह
आशिया खंडात पहिली औद्योगिक क्रांती जगातील श्री रामाचे नावाने असलेल्या एकमेव श्रीरामपूर शहरालगत झाली.
मात्र झालेली वाताहत जाणून घेऊन गतिमान आणि कार्यक्षम म्हणणारे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांनी तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करून श्रीरामपूर शापमुक्त करावे अशीमागणी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने केले.
रामायणकालीन अहिल्या शिळा ज्याप्रमाणे शापमुक्त झाली, त्याप्रमाणे श्रीरामपूर एकदाचे शाप मुक्त व्हावे, यासाठी प्रभू श्रीरामांना संघर्ष समितीने साकडे घातले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे, उपाध्यक्ष अॅड. सुभाष जंगले अशोक बागुल, भागचंद औताडे, लकी सेठी, विजय नगरकर, राजेंद्र गोरे, अभिषेक बोर्डे, बाबा शेख, माणिक जाधव, शिवाजी सिनारे, संदीप गायधने, प्रा. अशोक राहाणे आदी उपस्थित होते.
आजची श्रीरामपूरची झालेली वाताहत भविष्यात कोणालाही परवडणारी नसेल त्यामुळे यावर गांभीर्याने आत्मचिंतन व्हावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.