अहमदनगरच्या शेजारी शेतीला एकरी ५ कोटींचा भाव ! सर्वसामान्यांच स्वप्न आवाक्याबाहेर

जमीन घेणं आता अवघड झालंय. आहे तेच टिकवलं तरी मिळवलं.. असे उद्गार अनेक लोकांच्या तोंडून बाहेर पडताना दिसतायेत. परंतु हे जरी खरं असलं तरी जमीन खरेदी करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.

Updated on -

Ahmednagar News : जमीन घेणं आता अवघड झालंय. आहे तेच टिकवलं तरी मिळवलं.. असे उद्गार अनेक लोकांच्या तोंडून बाहेर पडताना दिसतायेत.

परंतु हे जरी खरं असलं तरी जमीन खरेदी करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. परंतु सर्वसामान्य जनता या खरेदीदारांच्या यादीत किती समाविष्ट आहे हे मात्र कुणालाच ठाऊक नाही. सध्या विविध शहरात, शहरालगत जमिनीचे भाव आसमंताला भिडलेत.

आता अहमदनगर जिल्ह्याशेजारील जिल्हा घ्या. छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यात वाढते औद्योगिकीकरण, तुलनेने निवासासाठी शांत आणि सुरक्षित शहर, शैक्षणिक हब, विभागीय कार्यालये यामुळे आता येथील लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे विस्तार होणे हे योगाने आलेच.

त्यामुळे या जिल्ह्याच्या चारही बाजूने शहराचे विस्तारीकरण झपाट्याने वाढत आहे. सध्या शेती पिकविण्यासाठी कमी पण प्लॉटिंगसाठीच शेती खरेदी करण्यावर अनेकांचा भर दिसून येतो.

सध्या शहरालगत एकरी ४ ते ५ कोटी रुपयांपर्यंत जमिनीचे भाव गेलेले आहेत. त्यामुळे आता जमीन घेण्याचे किंवा घर घेण्याचे सर्वसामान्यांच स्वप्न आवाक्याबाहेर चाललंय का?अशी भ्रांत पडायला लागलीये.

अहमदनगरच्या शेजारीच असणाऱ्या या शहरालगत म्हणजे सातारा, देवळाई, वाळूज, हर्मूल-चौका, सावंगी ते केंब्रीज रोड, शेंद्रा, पैठण रोड आणि पडेगाव- दौलताबाद आणि पैठण रोड या शहराच्या चारही दिशेने शेती आणि प्लॉटिंगचे भाव आवाक्याच्या बाहेर गेले आहेत.

दरम्यान, सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आवाक्याबाहेर गेले आहे. सध्या यामुळेच शेती पिकविण्यसाठी कमी आणि प्लॉटिंगसाठी खरेदी करण्यावर भर दिसत आहे.

कुठे किती भाव?
सातारा :
सातारा बीड बायपासकडे एकरी सुमारे ३.५० कोटी जमिनीचा दर आहे.

पैठण रोड :
पैठण रोडवर २.५० कोटींचा जमिनीचा भाव आहे.
देवळाई : साताऱ्याच्या बाजूला देवळाई रोडवर ४ कोटींचा भाव आहे.

पडेगाव : पडेगाव व दौलताबाद परिसरात रस्त्यावरील जमिनीचा दर ५ कोटींपर्यंत गेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe