अहमदनगरमधील ‘या’ गावात होणार भव्य वन उद्यान ! १० कोटी निधी मंजूर

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने निसर्ग पर्यटन याजनेंतर्गत अटल वन उद्यान उभारण्यासाठी नऊ कोटी ९६ लाख ३१ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

Published on -

Ahmednagar News : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने निसर्ग पर्यटन याजनेंतर्गत अटल वन उद्यान उभारण्यासाठी नऊ कोटी ९६ लाख ३१ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. हे वन उद्यान पारनेर तालुक्यातील सुपा येथे होणारही. याबाबत माहिती भाजपचे सागर मैड यांनी दिली.

या निधीतून सुपा परिसरात वन उद्यान साकारण्यात येणार असून गावचा विस्तार पाहता हे वन उद्यान नागरिकांसाठी संजीवनी ठरणार आहे. यासाठी सागर मैड यांनी सातत्याने वनमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, या उद्यानाचा उपयोग लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना होणार आहे.

सुपा फॉरेस्ट गटनंबर ४०७ सुपा पिंपळगाव कौडा रोडलगत खडकवाडी जवळ हे उद्यान नियोजित असून, मा. खा. डॉ. सुजय विखे यांच्या निधीतून या रस्त्याचे कामही पूर्ण झालेले आहे. या वन उद्यानात लहान मुलांसाठी बगीचा, प्रौढांना बसण्यासाठी प्रशस्त लॉन्स, बाकडे, फुलपाखरू बाग, बांबू गार्डन,

बॉक्स गार्डन, हार्ड गार्डन, कॅटक्स गार्डन, सेल्फी पाईट, ब्रिज, पिकनिक पॉईंट, प्राकृतिक जलस्रोत, नियोजित माहिती फलक, यामध्ये सुपा गावाला लाभलेला ऐतिहासिक वारसा याबाबतची माहिती, अशा विविध बाबींचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाची बैठक

दि.२३ जुलै रोजी पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक वन उद्यानांना मंजूरी मिळाली आहे. सुपा गावासाठी वन उद्यान अतिशय गरजेचे असल्याने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतल्याचे सागर मैड यांनी सांगितले.

महाराष्ट्रात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारच्या माध्यमातून सुपा गावासाठी आतापर्यंत ७५ कोटीपेक्षा जास्त निधी आणता आला, हे सुपा ग्रामवासियांच्या सहकार्यामुळे शक्य झाले असून, यापुढेही जास्तीत जास्त कामे आणण्याचा प्रयत्न करणार आहे असे सागर मैड यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe