चिमुरड्यावर बिबट्याची झेप, अंगणातून ६०० फूट फरफटत नेले.. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला अहमदनगरमध्ये थरार

घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्षे वयाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून ६०० फूट अंतरावर फरफटत नेले. या हल्ल्यात चिमूरड्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला.

Ahmednagarlive24 office
Published:
bibatya

Ahmednagar News : घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्षे वयाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून ६०० फूट अंतरावर फरफटत नेले. या हल्ल्यात चिमूरड्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला.

रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला ही खळबळजनक घटना घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना राहाता तालुक्यातील चितळी गावात घडली. वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की चितळी येथील मयूर दत्तात्रय वाघ यांची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वाकडी रोडवर काकडाई मंदिराजवळ आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रथमेश अंगणात खेळत होता.

त्याचवेळी घराशेजारील डाळिंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत त्याच्यावर हल्ला केला व त्याला घेऊन क्षणार्धात धूम ठोकली. बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व व्यक्ती बिबट्याच्या दिशेने धावल्या मात्र बिबटया मिळून न आल्याने घरच्यांनी डाळिंब व मका पिकांसह इतरत्र शोध घेतला.

तेव्हा घरापासून ६०० फूट अंतरावरील गिन्नी गवतात रक्तभंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला. त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम झालेली होती. त्यामुळे तो जागेवरच गतप्राण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

तातडीने पुढील उपचारार्थ श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला ही खळबळजनक घटना घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना व नागरिकांत दहशत वाढत चालली आहे. याआधीही तालुक्यात अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe