ए पीआय, गाणं लाव ना.. ए डीवायएसपी, तुला कळत नाही का?, दहीहंडीच्या कार्यक्रमात खा.लंकेंचा पोलिसांसोबत ‘राडा’, समर्थकांच्या शिट्ट्या

ए पीआय, गाणं लाव ना.. ते मिक्सर लाव. तुला सांगितलेलं कळत नाही का? ए डीवायएसपी, तुला सांगितलेल कळत नाही का? अजून अर्धातास डीजे वाजू दे ना... थोडी लाज वाटू दे ना, तुला प्रेमाची भाषा कळत नाही का? मला नोटीस काढ ना..

Updated on -

Ahmednagar News : ए पीआय, गाणं लाव ना.. ते मिक्सर लाव. तुला सांगितलेलं कळत नाही का? ए डीवायएसपी, तुला सांगितलेल कळत नाही का? अजून अर्धातास डीजे वाजू दे ना…

थोडी लाज वाटू दे ना, तुला प्रेमाची भाषा कळत नाही का? मला नोटीस काढ ना, माझ्यावर गुन्हा दाखल कर ना, मला माहित आहे तु लै शहाणा आहेस…?

ओ खैरे साहेब, आमचं थोड ऐका ना… हे शब्द आहेत खा. निलेश लंके यांचे. नगर शहरातील दहीहंडीच्या कार्यक्रमातील उत्सवात.

निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीच्या कर्यक्रमात रात्री दहानंतर डीजे बंद केल्यामुळे अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त करत पोलीस अधिकाऱ्यांना आरेरावी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा निलेश लंके यांचे वक्तव्य चर्चेत आलंय.

निवडणुकीच्या काळात पोलिसांना केलेली अरेरावी भाषा चांगलीच व्हायरल झाली होती. आता पुन्हा एकदा अशा भाषेत, अरेरावी केल्याने खा. लंके चांगलेच ट्रोल झालेत.

नेमके काय घडले?
नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सायंकाळी चितळे रस्ता परिसरात दहीहंडीचे आयोजन केले होते. रात्री उशीरापर्यंत हा दहीहंडी सोहळा सुरू होता.

कालिचरण महाराज देखील या कार्यक्रमाला आले होते. रात्री दहानंतर नियमाने डीजे बंद केले जातात. तीच कारवाई पोलिसांनी केल्यानंतर खा. लंके यांनी पोलिसांचा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर एकेरी उल्लेख करत पाणउतारा केला.

कार्यकर्त्यांच्या शिट्ट्या
कार्यक्रमस्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधिक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक असे प्रमुख अधिकारी तेथे बंदोबस्तास होते. जसे जसे खा. लंके बोलत होते, तशा गर्दीतून शिट्या आणि समर्थनाचे आवाज येत होते असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe