रिव्हॉल्व्हरच्या धाकाने अपहरण, साताऱ्यात फिरवलं, केडगावात सोडलं… अहमदनगरमधील अपहृत ग्रामपंचायत सदस्याने सगळं सांगितलं..

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायत सदस्याचे बंदुकीच्या धाकावर अपहरण झाल्याची घटना दोन तीन दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान या घटनेबाबत केवळ चर्चा सुरु होत्या , निश्चित अशी माहिती समोर येत नव्हती.

Ahmednagarlive24 office
Published:
KIDNAP

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायत सदस्याचे बंदुकीच्या धाकावर अपहरण झाल्याची घटना दोन तीन दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान या घटनेबाबत केवळ चर्चा सुरु होत्या , निश्चित अशी माहिती समोर येत नव्हती.

आता खुद्द अपहरण करण्यात आलेल्या व तीन दिवसांनंतर परतलेल्या ग्रामपंचायत सदस्यानेच आपल्यासोबत काय झाले हे सांगितले आहे. त्याची आपबिती ऐकून गावकरीही शॉक झाले. अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी रिव्हॉल्व्हर लावून अपहरण करण्यात आला असे त्या सदस्याने सांगितले.

रिव्हॉल्व्हरधारी अज्ञात व्यक्तींनी अपहरणानंतर सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरविले. दुसऱ्या दिवशी केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथे अपहरणकर्त्यांनी सोडले. त्यानंतर घरी संपर्क करून सुखरूप असल्याचे सांगितले.

सरपंच आणि उपसरपंच यांच्याविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि. १०) विशेष सभेचे आयोजन केले होते. त्या आधी मंगळवारी (दि. ९) ग्रामपंचायत सदस्य नितीन गव्हाणे यांचे अपहरण झाले.

त्याप्रकरणी मिरजगाव (ता. कर्जत) येथे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्यासह अज्ञात सात व्यक्तींविरुद्ध रिव्हॉल्व्हरच्या धाकाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. अविश्वास ठराव आवश्यक संख्याबळ नसल्याने फेटाळण्यात आला. दोन्ही पदाधिकाऱ्यांचे पद वाचले.

परंतु, अपहरण झालेल्या सदस्याचा शोध लागत नव्हता. शुक्रवारी (दि. १२) अपहरणाच्या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी घेतलेल्या सभेत हजर होऊन नितीन गव्हाणे याने वरील सर्व घटनाक्रम सांगितला.

दरम्यान नितीन गव्हाणेकडून मिळालेल्या माहितीवरून तपास सुरू असून अपहरणातील आरोपी निष्पन्न झालेत व त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe