Ahmednagar News : शिर्डीत साई दर्शनानंतर हॉटेलवर रंगली दारू पार्टी, नशेत टेरेसवरून थेट खाली कोसळला..

दारूची नशा करणे व दारुची पार्टी करणे तरूणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत शिर्डीला आलेल्या एकाचा हॉटेलच्या टेरेसवरून खाली पडून जीव गेल्याची घटना घडलीये. शुभम नारखेडे असे मृताचे नाव असल्याचे समजते.

Published on -

Ahmednagar News : दारूची नशा करणे व दारुची पार्टी करणे तरूणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत शिर्डीला आलेल्या एकाचा हॉटेलच्या टेरेसवरून खाली पडून जीव गेल्याची घटना घडलीये. शुभम नारखेडे असे मृताचे नाव असल्याचे समजते.

शिर्डीनजीक निमगाव शिवारात देशमुख चारीजवळील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, शेंबा बुद्रुक येथील तीन ते चार तरुण मित्र शनिवारी शिर्डीत दर्शनासाठी आले होते. त्यांनी सायंकाळी निमगाव हद्दीत हॉटेल येथे राहण्यासाठी लॉज घेतला.

दर्शनानंतर त्यांनी पार्टीचा बेत आखला. पार्टी करून रात्री उशिरा १२ च्या दरम्यान सर्व मित्र हॉटेलला परतले. इतर मित्र लॉजमध्ये गेले. मात्र, त्यातील २३ वर्षीय शुभम सुहास नारखेडे हा तरुण हॉटेलच्या गच्चीवर गेला. त्या ठिकाणी त्याचा तोल जाऊन हॉटेलच्या मागच्या बाजूला तो कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी सर्वजण झोपेतून उठल्यानंतर मित्र कुठेही दिसत नाही म्हणून शोध घेतला असता हॉटेलच्या मागच्या बाजूला तो मृत अवस्थेत आढळून आला. हॉटेलवर असलेल्या मित्रांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी हजर झाले व त्यांनी हॉटेल मालक,

मॅनेजर, रूम बॉय व त्या मृत तरुणा बरोबर असलेल्या सर्व मित्रांची चौकशी केली. विशेष म्हणजे हे सर्व तरुण सधन कुटुंबातील दिसत आहेत. त्यांनी येताना काळ्या रंगाची थार गाडी आणली. मृत्यू कसा झाला याबाबत शिर्डी पोलिस तपास करत आहेत. 

दरम्यान या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe