अहमदनगर हॉटस्पॉट ! अपघातांमध्ये जिल्हा ‘टॉप फाइव्ह’, सहा महिन्यांत ६१८ अपघात तर तीन वर्षात पाच हजार मृत्यू, पहा आकडेवारी

अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. होणारे अपघात व त्यातील मृत्यूंचे प्रमाण ही गोष्ट चिंताजनक बनत चालली आहे. मागील सहा महिन्यांचा राज्यातील अपघातांचा विचार करता अहमदनगर जिल्हा हा टॉप फाईव्ह मध्ये जिल्हा समोर आलाय.

Ahmednagarlive24 office
Published:
Accident

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. होणारे अपघात व त्यातील मृत्यूंचे प्रमाण ही गोष्ट चिंताजनक बनत चालली आहे. मागील सहा महिन्यांचा राज्यातील अपघातांचा विचार करता अहमदनगर जिल्हा हा टॉप फाईव्ह मध्ये जिल्हा समोर आलाय.

जानेवारी ते जून २०२४ या काळात प्रशासनाच्या प्रशासनाच्या इंटिग्रेटेड रोड ऍक्सीडेन्ट डेटाबेस अॅपवर अपघातांची नोंद झाली आहे. त्यानुसार राज्यात सर्वाधिक अपघात मुंबई, पुणे, ग्रामीण, नाशिक, कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात झाले असल्याचे समोर आले आहे.

आकडेवारी वर जर नजर टाकली तर मुंबई ९८३, नाशिक ६९५, कोल्हापूर ६७४, पुणे ग्रामीण ६२०, अहमदनगर ६१८ अशी अपघातांची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीवरून अहमदनगर जिल्हा अपघातांचे हॉटस्पॉट बनले असल्याचे दिसते.

अपघात का होतात याची जर करणीमिमांसा केली तर वाहतुकीचे नियम व वेगमर्यादा न पाळल्याने सर्वाधिक अपघात होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याअंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्याने अंतर्गत रस्त्यांवर अपघात होत असून,

सर्वाधिक अपघात दुचाकींचे होतात. वाहतुकीचे नियम न पाळणे, हेल्मेट नसणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे यामुळे अपघातांत मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.

२०२१ ते जून २०२४ या तीन हजारांहून अधिक मृत्यू
२०२१ ते जून २०२४ या काळात शहरासह ग्रामीण भागात ५,११० अपघात झालेले आहेत. या अपघातांत तीन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाच्या अॅपवरून समोर आले आहे.

सहा महिन्यांत झालेले अपघात
प्रणांतिक अपघात ४२३, मृत्यू – ४४९
गंभीर अपघात – ४५२, जखमी- ६१०
किरकोळ अपघात ७२, जखमी – ८९

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe