अहमदनगर हादरले ! शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयातील कचरा कुंडीत आढळला बालकाचा मृतदेह

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयातील कचरा कुंडीत स्त्री जातीचे बेवारस अर्भक प्रसूती वॉर्ड शेजारील कचराकुंडीमध्ये सापडले आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
sasnthan

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयातील कचरा कुंडीत स्त्री जातीचे बेवारस अर्भक प्रसूती वॉर्ड शेजारील कचराकुंडीमध्ये सापडले आहे.

काल मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना समोर आली. हा प्रकार पुढे आल्याने एकच खळबळ उडाली.

मुलगा मुलगी एकसमान असतात असे सर्वचजण म्हणत असतात. परंतु समाजात अद्यापही मुलीस नाकारले जाते आहे हे वास्तव अशा अनेक घटनांतून समोर येते. त्यामुळे पुन्हा एकदा अशा घटना चिंतनाचा विषय ठरतात.

आता शिर्डीतील या घटनेने सर्वांचेच डोळे पाणवले आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचे नागरिक म्हणत आहेत. काल रात्री अकराच्या सुमारास सफाई कर्मचारी सफाई करत असताना स्त्री जातीच बेवारस अर्भक हे या कचराकुंडीत मिळून आले आहे.

त्यानंतर या प्रकरणाचा सगळं उलगडा होत गेला. कॅरीबॅग मध्ये जड वस्तू दिसल्याचे सदर कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने ते उघडून पाहिले. त्यात स्त्री जातीचे नुकत्याच काही तासांपूर्वी जन्मलेल अर्भक मृत अवस्थेत होते असे त्याने म्हटले आहे.

संस्थानच्या दाव्याने गूढ आणखीनच वाढले
दरम्यान हे अर्भक साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात जन्माला आले नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे. तसेच आता सीसीटीव्ही तपासणी सुरु केली आहे. नेमके हे अर्भक कुणी आणून येथे टाकले याबाबत आता शोध सुरु आहे.

हा शोध घेणे तसेच या बेवारस मृत अर्भकाचे माता-पिता कोण याचाही शोध घेणे आता मोठे आवाहन असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe